Lokmat News | अहो आश्चर्यम | पाल, झुरळ, कीटक आणि उंदीर खाणारा Madman | Lokmat Marathi News

2021-09-13 0

पूर्व कोलकाताच्या सियालदाह रेल्वे स्टेशनवर असा एक युवक आहे, जो जेवणात पाल, झुरळ आणि उंदीर खातो. ऐकून आश्चर्य वाटेल, मात्र हे खरं आहे. खरंतर या जीवांना खाणं त्यांची आवड नाही तर नाईलाज आहे. स्वत:चं पोट भरण्यासाठी तो पाल, झुरळ आणि उंदीर यांना खातो. अमित कर्माकर असं या २५ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो सियालदाह स्टेशनजवळ कीटक, पाल, झुरळ, उंदीर शोधत फिरत असतो. एकदा त्याने कावळ्याच्या पिल्लाला खाल्ल होतं, त्यानंतर कावळ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. त्याच्या या सवयीमुळे आरपीएफने अनेकदा त्याला मारहाण केली आहे, मात्र तो काही सुधारला नाही.अमितने याविषयी बोलताना सांगितलं की, पाल, झुरळ, उंदीर, किटक इत्यादी माझ्या जेवणाचा भाग आहे. त्यांना खाल्ल्याशिवाय माझं जेवण स्वादिष्ट होत नाही. मात्र थंडीत पाल पकडणे कठीण काम आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires